Curiosity will conquer fear even more than bravery will. -James Stephens
TwitterLiked the quote? Tweet it!
see all quotes

२०१२-०९-०९ निखिल वागळे यांची मुलाखत


Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser.

भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज ९७ वर्षांनंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. २५ औगस्ट २०१२, या गुरुवारी पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकायला मिळाला. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' असे विचारायलाच जणू काही ते समयोचित सरसावले आहेत असे क्षणभर मला वाटले.

यावेळी सुप्रसिध्द निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांची मुलाखत घेतली.

मराठी मनाला जवळ असलेल्या, ध्येयवादी विचार, स्पश्टवक्तेपणा आणी तडफदार कार्य असणाऱ्या, एक पत्रकाराची ही मुलाखत नक्की पहा. त्यातील माझी काही टिपणे खाली दिली आहेत.

निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत ( भाग 1 )

 • मी बिहारच्या गावा-गावात फिरून पत्रकारिता शिकलो, महाराष्ट्राच्या शाळेत नाही
 • जे पी म्हणाले प्रश्न विचारायला शिका
 • आजपर्यंतच्या सात हल्ल्यांतून मी वाचलो
 • समाजातले आणि सरकारातले उणे मोरपिसाने दूर होत नही, त्याला फटकेच मारावे लागतात
 • बोली मराठी पहिल्यांदा 'महानगर' मध्ये वापरली गेली, अशोक शहाण्यांना त्याचे क्रेडिट जाते
 • ह्यूमन राईट्स सर्वात महत्वाचे
 • आपल्याशी सहमत नसलेल्या व्यक्तीचे आपण वाचतो आणि त्याचा आनंद घेतो हे महत्वाचे आहे
 • हल्ला होऊन सर्व कपडे फेडलेल्य अवस्थेत कुणितरी दिलेली लुंगी नेसून बेहेऱ्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्ण केला
 • मराठी समाजाला आपल्या माणसाचे कौतुक नाही. शी. ग. माजगांवकर यांना आपण विसरलोय
 • मनोहर कदम लिखित नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र - ते महात्मा फुल्यांच्या 'दीनबंधू' चे सम्पादक होते, भरतातल्या पहिल्या मिल यूनियन चे लीडर होते. आज महाराषट्रातल्या अनेक पत्रकार भवनांतून टिळक, आगरकर (त्यांचे समकालीन) यांच्याबरोबर त्यांचे फोटो लागले आहेत

निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत ( भाग 2)

 • लोकशाही मध्ये मला एकमेव अधिकार आहे. मला बोलू द्या.
 • मी कोणाला फायदा होईल हे बघत नही. मी फक्त मुलाखत चांगली कशी होईल ते बघतो
 • बाळासाहेब हे व्यक्तिमत्व अभूतपूर्व आहे
 • तुम्हीसुद्धा कधीतरी लढायला या एवढेच माझे म्हणणे आहे
 • सामान्य माणसाला आवाज पाहिजे
 • महाराष्ट्र गरीब झाला आणि नेते श्रीमंत झाले हे कसे काय ?
 • जनतेने मत देऊन सरकार बदलले पाहिजे
 • प्रिंट ची खोली आणि टेलीविजन ची रीच समाधन देतात, ही दोन्ही माध्यमे कोंप्लीमेंटरी आहेत
 • टिळकांच्या आवाजाची व्हॅल्यू करण्याच्या पलिकडे आहे, आपला देशाला आरकाईव्स चे महत्व नाही
 • टेलीव्हिजन अधिक इनफोरमल होणार आहे, त्याची तयारी ठेवा


Tags: Nikhil, Wagle, Interview


All comments sent via email to this address will be moderated and posted here. Assuming you won't want to be spammed, I will not share your email address or web address unless you explicitly mention in the email :)


Message in Public Interest
Laughing ...

About

Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.