When you reach a state where you will have a lot to say, you will find that whatever you want to say cannot be said. -Osho
TwitterLiked the quote? Tweet it!
see all quotes

पुस्तक परिचय: देवगंधर्व (भास्करबुवा बखले), शैला दातार


Author: शैला दातार
Publish Date: 2008
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
URL: @ Amazon
Atul's Rating: *****

पुणे भारत गायन समाजाच्या वास्तू मध्ये संगीत कार्यक्रमांनिमित्त अधून मधून जाणे होते. मी मुद्दामच भारतीय बैठक पसंत करतो. त्याचे प्रमुख कारण, व्यासपीठावरती असलेले भास्करबुवांचे चित्र. प्रसन्न मुद्रेने ते माझ्याकडे पहात आषीश देत आहेत असे मला का वाटते कुणास ठाऊक. नुकतेच, त्यांच्या नातसून शैला दातार यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र वाचनात आले.

आपल्या मनोगतामध्ये लेखिकेने श्री ना पेंडसे यांच्या मार्गदर्शनाबद्दल व त्यांना भास्करबुवांच्या सांगीतिक परिवाराकडून मिळालेल्या सहयोगाबद्दल क्रुतज्ञता व्यक्त केली आहे. सतत १५ वर्षे केलेल्या अथक परिश्रमांबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. महाराष्ट्राचा सांगीतिक झेंडा अटकेपार रोवणाऱ्या व मराठी संगीत रंगभूमीचा आधारस्तंभ असणाऱ्या या ऋषीचे इतके आनंददायी ललित चरित्र त्यांच्याहातून झाले आहे की देवगंधर्वांचा लेखिकेला असलेला आषीश वाचकाच्या मनाला खचितच जाणवतो. काळाचा पडदा सारून संगीत रसिकाचे मन, हे स्वरभास्कराचे किरण पोहोचवून उजळून टाकल्याबदल शैला ताईंचे शतश: आभार.

बुवांचे बालपण, कौटुंबिक जीवन, शिष्यांशी वागणुक, गुरू-कुटुंबाची घेतलेली जवाबदारी, इत्यादी अत्यन्त ह्रुद्य आहे. त्यांनी संगीत विद्या आत्मसात करण्यासाठी केलेले भगिरथ प्रयत्न, विविध गुरूंची केलेली सेवा, सर्व संगीत प्रकारातले त्यांचे प्राविण्य व पेललेले सांगीतिक आव्हान, प्रेरक आहेत. त्यांनी अभिजात संगीत समाजाभिमुख व्हावे म्हणून केलेले यशस्वी प्रयत्न, व विविध शिष्यांना ध्येयानुरूप दिलेले शिक्षण, व समकालीन तज्ञांचा ठेवलेला आदर मार्गदर्शक आहेत.

पुस्तकात दिलेले त्यांचे विचार - "आपल्या गाण्याची किंमत पैशात केली तर विद्येची किंमत कमी होईल.", "सफल गायकाचे बक्षीस, सफल गायन हेच होऊ शकते.", "गायकाच्या अहंतेला मैफिल बेहोश करणारे गायनच अलंकार म्हणून शोभते", "नादसमुद्र अपरंपार आहे, कोणी गायक लहान-मोठा नाही, ज्याचे आवडेल त्याचे ऐकावे", "कार्यक्रमात जे चांगले झाले ते गुरुजींचे व जे चुकले ते माझे", "कष्टाशिवाय फळ नाही व गुरुक्रुपेशिवाय यश नाही", "मी कोणी विशेष आहे म्हणून गाईल, त्याच्यापासून यश दूर जाईल, "ज्याप्रमाणे रणांगणावर जाणाऱ्या वीराची तलवार गंजलेली असता कामा नये, तसेच गाणाऱ्याचा आवाज नेहमी तय्यार हवा, त्याने कधीच कोणतीच सबब सांगता कामा नये", "विद्या दिल्याने वाढते व आपली योग्यता वृध्धिंगत होते" - ही शिष्यार्जुन व रसिकार्जुन यांसाठी 'गीता' नाही काय ?

बुवांची नाट्यपदे, त्यांच्या गुरूंबद्दल माहिती, शिष्य परिवाराविषयी माहिती, त्यांना शिकवण्याची पद्धत, पंजाब, पेशावर पासून धारवाड, बंगलोर पर्यंत झालेल्या मैफिली, तसेच त्यांनी लिहिलेला एक लेख, असा बराच खजिना या पुस्तकात आहे. पुस्तक मराठी व हिंदी दोन्ही भाषांत आहे. सर्वांनी जरूर वाचावे.

Message in Public Interest
Laughing ...

About

Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.