नारळ आणी माणूस, दर्शनी कितीही चांगले असले तरी, नारळ 🥥 फोडल्या शिवाय, आणी माणूस जोडल्या 🤝🏻 शिवाय, कळत नाही.
TwitterLiked the quote? Tweet it!
see all quotes

२०१३-११-१३ एक होतं देऊळ


Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser.

नुकताच श्री उदयन इंदुरकर यांचा 'एक होते देऊळ' हा द्रुक-श्राव्य कार्यक्रम पाहण्यात आला. विविध प्राचीन मंदिरांतील विज्ञान आणि तत्वज्ञान यांचा महितीपूर्ण व मनोरंजक असा हा कार्यक्रम आहे. भारतीय स्थापत्याचा इतिहास उलगडताना विविध शिल्पांमधील सौंदर्याचे रसग्रहण करत कार्यक्रम छान गतीने पुढे सरकतो. वैविध्यपूर्ण छायाचित्रे व चित्रफिती यांची निवेदनाशी सुरेख सांगड घातलेली आहे.

भारतीय संस्कृतीतल्या बऱ्याच जुन्या संकल्पना, ज्यामगील वैज्ञानिक विचार आपण विसरलो आहोत, आणि ज्यांची आधुनिक विज्ञानाशी तुलना करत खिल्ली उडवण्याची, सुशिक्षित भारतियांना, म्हणजे आपल्याला, सवय झाली आहे, अशा संकल्पना या कार्यक्रमात आपल्यापुढे येतात. व आपल्याला विस्मयचकित करणारी अशी वैज्ञानिक रहस्ये उलगडून जातात. एका दगडातून, बरं का - दगडातून, म्हणजे दगडात कोरलेल्या शिल्पातून, मानवी जीवनातल्या भावना किती तपशीलात, बघणाऱ्यापर्यन्त पोहोचवता येतात ते पाहून आपण थक्क होत जातो.

Large Hadron Collider चा नटराजाशी काय संबंध आहे, Angkor Wat च्या देवळात भारतीयांची कालगणना कशी कोरून ठेवली आहे, व गुजरात मधील 'रानी की वाव' शिल्पालयात काय रहस्य communicate केलय, तसेच आज आपण इंग्रजीत trillion पर्यंतच (स्वतंत्रपणे) मोजू शकतो पण आपण संस्कृतात या पेक्षा order of magnitude नी मोठ्या असलेल्या संख्या फार पूर्वीपासूनच मोजत आलोय - यासारखी बरीच अवाक् करणारी माहिती दिल्याबद्दल मी श्री इंदुरकर व त्यांच्या टीमचे मन:पूर्वक आभार मानतो व त्यांना शुभेच्छा देतो.

आपल्याला अधिक माहिती त्यांच्या Facebook Page वर मिळेल.


Tags: Marathi, Udayan Indurkar, Temple, Architechture


All comments sent via email to this address will be moderated and posted here. Assuming you won't want to be spammed, I will not share your email address or web address unless you explicitly mention in the email :)

Message in Public Interest
Laughing ...

About

Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.