Any change in your life is 'mostly insignificant', given the larger sheme of things. The HHGTG describes the earth as 'mostly harmless'. -Atul Nene
TwitterLiked the quote? Tweet it!
see all quotes

२०१२-०४-०७ 'देऊळ' चित्रपटाच्या निमित्ताने


Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser.

श्रद्धा किंवा अन्धश्रद्धा हा विषय एकूणच अवघड. प्रत्येकाची आपलीच अशी खास व्याख्या, उधार - उसनवार घेतलेली. तुम्ही कुठल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत वाढलात व तुमचा व्यवसाय काय यावर तुमची श्रद्धस्थाने बरीचशी अवलंबून. धर्माचा अभ्यास असलेल्यांना त्यामागचे विज्ञान माहितच असेल असे नाही. असले तरी सांगता येईलच असे नाही. आले तरी ते ऐकणाऱ्याला कळेलच असे नाही. समजले नाही की श्रद्धा आलीच, 'तुला कळत नाही ना, मग मी सांगतो म्हणून व मी सांगतो तसे कर' हे म्हणणारे आलेच. याचा गैरवापर झाला की अन्धश्रद्धा झालीच. तीच परिस्थिती आधुनिक विज्ञान शिकलेल्यांची. असे अनेक गट आहेत. आपल्यापैकी प्रत्येक जण कुठल्यातरी गटात मोडतोच. बर, सर्व प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नाहीत असे वाटते. उणीवा सगळीकडेच बोचतात. कदाचित, नव्हे खचितच, आपल्याला कळत नाही म्हणूनच असे वाटत असणार ! म्हणजे हत्तीच्या आकाराची उकल करू पाहणाऱ्या सात आंधळ्यांच्या गोष्टी सारखे झाले!

शेवटी हे सर्व गट भरल्या पोटीच आपापल्या समजूतीची वकिली करतात. म्हणजे अर्थकारणावर डोळा ठेवूनच. पण ही 'सोय' बघितली तर मग मुळातून शोध घयायची इच्छा क्षीण होते. हे धोकादायक आहे. प्रत्येकाला प्रश्न पडले पाहिजेत. अमुक एक मला कळले नाही म्हणजे ते नसणारच असे म्हटले, किंवा कळत नाही म्हणून परंपरा सोडली, तरी प्रश्न अनुत्तरितच राहतात ना? मग त्यात कोणाचा फायदा आहे? नितांत आवश्यकता आहे ती वैज्ञानिक कुतुहल जागृत ठेवून कारणे शोधून काढण्याची. प्रत्येकाने स्वत:पुरती नक्कीच उत्तरे मिळवावीत. दुसऱ्याला सांगायला गेलो आणि त्याला कळले नाही तर अन्धश्रद्धा निर्माण केल्याचा धोका उरतोच ना ?

मुळात आध्यात्म, धर्म, संस्कृती, शिक्षण व अर्थकारण सुद्धा, समाजकारणासाठी आहेत (असे मला वाटते). या सगळ्यांच्या आधारे प्रत्येकाला, म्हणजे सर्व माणसांना, आपले जीवन निसर्गाला अनुसरून चांगल्या रितीने जगता यावे, एवढा तरी किमान हेतू असणारच, नाही का ? या हेतूच्या, ध्येया आड येणारा असमतोल जेव्हा समजातले घटक निर्माण करतात, तेव्हा काय होते (किंवा झाले आहे), याची सुंदर गोष्ट म्हणजे चित्रपट 'देऊळ'. चित्रपटाचे यश पाहता, बऱ्याच लोकांनी तो पाहिला असेल, त्यांना तो आवडला असेल. नुकतीच काही राष्ट्रीय पारितोषिकेही चित्रपटाला लाभली हे उत्तमच झाले. एक व्याख्यानामध्ये श्री गिरीष कुलकर्णी चित्रपटामागच्या भूमिके विषयी फार छान बोलले. त्यातील माझी टिपणे खलील प्रमाणे :

  • आजकाल कोणी नवीन चांगले कही निर्माण करताना दिसत नाहीत. चांगले काही शोधायचे असेल तर मागे जायला लागते
  • नेतृत्वहीन समाजामध्ये जर सामान्य माणसाने आपली जवाबदारी ओळखून कृतीप्रवणता अवलंबली नाही तर नित्य नवीन नेतृत्व आपले भ्रमनिरास करायला येतच राहील. हा वर्तमान आहे.
  • अपण निबर होत चाललो आहोत.
  • मास अपील असलेला एक तरी वैचारिक नेता देश पातळीवर आहे का ?
  • काही (भले अथवा बुरे) घडवण्याची ताकत राजकारण्यांत आहे
  • भाबडेपणा मध्ये प्रश्न विचारण्याची ताकत आहे. भाबडेपणा म्हणजे अडाणीपणा नव्हे, innocence होय.
  • आपल्या लोकांना भावुक झाले की मगच कळते ना ?
  • आपला समाज भाबडा आहे. माध्यमांतून जे समोर येईल ते खरे मानतो. आणि याचा (गैर) वापर केला जातोच.
  • तुम्हाला स्त्री देहाचा वापर जाहिरातीत करून एखादे product खपवलेले चालते, मग दत्तांच्या मागे वलय आणून चित्रपटाचा message खपवलेला का नाही चालत ?
  • आपली श्रद्धा वैयक्तिक आहे, ती डोळसपणे ठेवावी. त्याचा कोणालाही त्रास होणार नाही हे पाहण्याचे प्रत्येकाला स्वातन्त्र्य आहे.
  • देवाचा साक्षात्कार प्रत्येकाने आजच्या काळाप्रमाणे घयावा. निसर्ग हाच आजचा देव आहे. आज आपण त्याची पूजा केली नाही तर आपण उद्या कुणाचीच पूजा करायला उरणार नाही.

आपण हे व्याख्यान YouTube वर येथेयेथे पाहू शकता.


Tags: Marathi, Movie, deooLa, Umesh Kulkarni, Girish Kulkarni, nature


All comments sent via email to this address will be moderated and posted here. Assuming you won't want to be spammed, I will not share your email address or web address unless you explicitly mention in the email :)

Message in Public Interest
Laughing ...

About

Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.