Atul's Blog :
Thoughts, code, pearls
of management wisdom,
what have you...
Web Home
Blog Home

Send me email

Previous Posts

2018-03-30 To Laugh or Not to ...
2016-01-31 Bajirao Revisiting History
2014-09-07 Movie Review Rama Madhav
2013-12-14 St. Vincents Reunion
2013-11-13 Ancient Indian Architechture
2012-09-09 Nikhil Wagle Interview
2012-07-15 Creation of Shruti Priya
2012-04-07 In praise of the Marathi movie deooLa
2011-07-02 +1 for Google+
2011-05-15 Movie Review: BalGandharva
2010-11-21 IndicMobile Event
2010-11-12 MeeGo AppUp Event
2010-06-25 Master of Business Arts?
2009-10-12 Rethinking Presentations
2009-06-11 Employee Recognition
2009-03-27 Factors that drive Project Excellence
2008-12-29 Success and the Jigsaw Puzzle
2008-05-12 Making the Most of Meetings
2008-03-05 Measuring Job Satisfaction

२०११-०५-१५ बालगंधर्व - चित्रपट परीक्षण


Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser.

मराठी मनात काही समीकरणे जमली आहेत जशी पडद्यावर संत तुकाराम साकारावे ते विष्णुपंत पागनीस यांनीच व शिवाजी महाराज साकारावे ते काशीनाथ घाणेकर यांनीच. त्याच यादीत अजून एक नाव जावून बसले आहे असे वाटते - पडद्यावर बालगंधर्व साकारावे ते सुबोध भावे यांनीच !

नितीन देसाई यांच्या कंपूने तो काल छान साकारला आहे. चित्रपटाच्या शेवटी नामावलीच्या वेळेस जी बालगन्धर्वांची छायाचित्रे दाखवली आहेत त्यास आश्चर्यकारक रीत्या मिळती जुळती पात्रे साकारणारे कलाकार योजले आहेत. सेट तर उत्तम आहेतच - ते नितीन देसाई यांचे आहेत म्हणून हे वेगळे सांगायला नको. एवढे मोठे व्यक्तिमत्वाचा प्रवास थोड्या वेळात साकारायचा म्हणजे गडबड होणारच, तशी झाले आहे. पटकथा अगदी जलद गतीने पुढे सरकते. त्यात कुठेच, आगदी आवश्यक ठिकाणीही ठहराव नाही. सुरवातीच्या माहिती देणाऱ्या पाट्याही वाचता येत नाहीत. पण एकूण चित्रपट खुटखुटीत झाला आहे. अडीच ऐवजी तीन तास झाला असता तर गन्धर्वांवरील प्रेमामुळे रसिकांनी नक्कीच पहिला असता असे वाटते. असो.

चित्रपटात नाट्य प्रसंगांची, गाण्यांची, त्यांच्या व्यक्तिगत व कौटुंबिक आयुष्याची, तालमींची, नाटक कंपन्यांच्या व्यवहारांची सांगड छान घातली आहे. कोणताच भाग एकांगी वाटत नाही. सर्व कलाकारांचा अभिनय त्या काळाला साजेल असा आहे. बालगंधर्वांना गाणे आत्मसात करताना काही प्रसंग अजून दाखवले असते तर उत्तम झाले असते. ते नाही म्हणून कुठे उणेपण येत नाही. आनंद भाटे यांचा आवाज चपखल शोभला आहे. नाट्यपदांचे अल्प भाग घेतल्यामुळे जास्त नाटके व भूमिका दाखवता आल्या आहेत हे तितकेच खरे.

मराठी माणसाला काही साड्यांच्या रंग संगती व बालगंधर्वांचे दागिने फार आपलेसे - म्हणजे त्या काळाला व मराठी रुचीला साजेसे - वाटणार नाहीत कदाचित. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेली माणसे अजूनही हयात आहेत. हा प्रभाव नितीन देसाई यांच्या हिंदी चित्रपट पार्श्वभूमीचा असावा बहुतेक.

त्यांचा आयुष्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे प्रसंग तसेच व्यक्तिगत सुखादुखांचे प्रसंग छान जमले आहेत. त्यांचे कलेवराचे प्रेम, निष्ठा व नैपुण्य सर्व कलाकारांना प्रेरणादायी ठरेल. मायबाप रसिकाला विना तडजोड सर्वोत्तम तेच देण्याचे वृत्ती बाळगली तरच कलाकार संपन्न होत असतो. लोकमान्य टिळक, शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड अशा बऱ्याच विभूतींची छोटी दर्शने घडतात. गंधर्वांचे सहकारी व सहकलाकार यांच्याशी असलेले संबंध उत्तम टिपले आहेत. लोकांनी प्रतियोगी समजलेल्या कलाकारांबरोबर रंगमंचावर कला पेश करून व ती करताना स्वतः लहान होऊन विद्या संपादन करण्याचा व त्याचे कौतुक व ऋण व्यक्त करण्याचा प्रसंग अगदी खास जमला आहे.

चित्रपटात ऑर्गन, सारंगी, यांची संगत अधोरेखित केली आहे. 'द्रौपदी' मधील 'मयसभा' खासच. त्यांची शेवटची वर्षे संयुक्तिक दाखवली आहेत. त्यांचा स्वाभिमान, विना कष्टाची आर्थिक मदत न घेणे, पुरुषार्थ, निःसंग होऊन जाण्याची इच्छा, 'कलाकाराने अजरामर होण्यासाठी नाही तर आनंदासाठी काम करावे', असे त्यांच्या तत्वज्ञानातील मोती विविध प्रसंगातून उत्तम वेचले आहेत. प्रेक्षकाच्या मनात त्यांची व्यक्तिरेखा घडवत, रुजवतच चित्रपट पूर्ण होतो.

अजून खूप लिहिता येईल, पण प्रत्यक्ष बघण्यात तुम्हाला जास्त मजा येईल हे नक्की. आजच्या व भावी पिढ्यांसाठी बालगन्धर्वांची महती लक्षात येण्याजोगा हा चित्रपट आहे हे खचित. सर्वानी आवर्जून पाहावा व डीव्हीडी उपलब्ध झाल्यावर संग्रही ठेवावी.


Tags: Marathi, Movie, BalGandharva, Subodh Bhave, Nitin Desai, Review


All comments sent via email to this address will be moderated and posted here. Assuming you won't want to be spammed, I will not share your email address or web address unless you explicitly mention in the email :)


2011-05-31 Sudarshan Natu: Uttam blog lihila ahesh. Nirikhshan or barkave pan! Chitrapat baghtana tuzi athwan yenar.

2011-06-19 Rajendra Sapre: Look at the critiques views about the movie we liked - here. Look from the point of view of "The Clean Coders!"

Atul: Yes, I liked the review too. It has valid points. However, the film was made first as a commercial activity and then secondly as a balgandharva biography. Only a documentary film would have made this critic happy but, for financial reasons, nobody would have made it, and even if it was made, it wouldnt have been able to create such public awareness about balgandharva. So even with all its shortcomings, I prefer the movie as is.
Advertise with us

Message in
Public Interest
www.atulnene.com ©1998-2016 Atul Nene
>-x))>